माजलगाव धरणातून 56,193 क्युसेक पाण्याचा विसर्ग ; सिंधफणा व गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग झपाट्याने वाढवण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी (दि. 15 सप्टेंबर 2025) दुपारी दोन वाजता दहा वक्रद्वारे अर्धा मीटरने उघडण्याचा निर्णय घेतला.

Amazon

Amazon App Player

Download Now

सध्या माजलगाव धरणाचे वक्रद्वार क्रमांक 11, 6, 16, 10, 12, 9, 13, 8, 14 आणि 15 हे प्रत्येकी 1.50 मीटरने उघडे असून एकूण 56,193 क्युसेक (1591.18 क्युमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग सिंधफणा नदीपात्रात सुरू आहे. धरणात सातत्याने मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.

पूरनियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, पुढील काही तासांमध्ये धरणात आणखी पाणी आले तर विसर्ग वाढवावा लागू शकतो. यामुळे सिंधफणा व गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे अनावश्यक हालचाल टाळावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे आधीच बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे पिके, कांद्याचे चाळ आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत धरणाचा वाढता विसर्ग ही चिंता अधिक वाढवणारी बाब ठरत आहे.

माजलगाव प्रकल्प पूरनियंत्रण कक्षाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now