बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतःमाजलगाव, धारूर, आष्टी आणि परळी परिसरात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
धारूर तालुक्यातील आसरडोह येथे माजलगाव–आडस मुख्य रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. हिंगणी बु. येथे पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून जहांगीर मोहा गावात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, आष्टी तालुक्यातील गहुखेल येथे पुराचे रौद्ररूप समोर आले आहे. नदीच्या पुरात कांद्याचा चाळ कांद्यासह वाहून गेला असून त्यामागेच एक पिकअप वाहनही पुराच्या लाटेत सापडले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अद्याप या नुकसानीचा तपशील समोर आलेला नसला तरी, पिके, जनावरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गहूखेल येथील सचिन शेकडे यांनी ही माहिती दिली आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
पोहनेर पाथरी रस्ता देखील बंद करण्यात आला असून पोहनेर पुलावर पाणी आल्याने स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे. परळी तालुक्यातही अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
माजलगाव प्रकल्पातून सध्या 19,806 क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने सिंधफणा नदीमध्ये पूरसदृश्य परिस्थिती कायम आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला असून विसर्ग वाढवावा लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
याशिवाय आष्टी तालुक्यातील कडा परिसरातील सहा गावांना पाण्याचा वेढा बसला आहे. या गंभीर परिस्थितीत एनडीआरएफ आणि भारतीय सैन्याला मदतीसाठी बोलावण्यात आले आहे.
स्थानिक खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी नागरिकांना शांतता व धैर्य राखण्याचे आवाहन केले असून नदीकाठच्या गावांनी सतर्क राहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची सूचना दिली आहे.
बीड जिल्ह्यातील नागरिकांसमोर सध्या मोठे संकट उभे ठाकले असून पावसाने निर्माण केलेल्या या भीषण परिस्थितीवर प्रशासन कसोशीने मात करण्याचा प्रयत्न करत आहे.