माजलगाव :
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची अवैधरीत्या साठवणूक व विक्री करणाऱ्यावर माजलगाव शहर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. ही धडक कारवाई गुरुवार, दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आली.

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली होती की, सचिन गोरख सुरवसे (रा. शेलापुरी, ता. माजलगाव, जि. बीड) हा आपल्या राहत्या घरी गुटखा साठवून त्याची चोरटी विक्री करीत आहे. मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार पोलिसांनी पंचासमक्ष त्याच्या घरावर छापा टाकला.
झडतीदरम्यान पोलिसांना दोन पांढऱ्या रंगाच्या गोण्या आढळून आल्या. त्यामध्ये केसरयुक्त विमल पान मसाला व विमल कंपनीचा सुगंधीत तंबाखू असा एकूण 16,470 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. हा सर्व प्रतिबंधीत गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनित कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके व उपविभागीय पोलीस अधिकारी माजलगाव निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, पोउपनि केरबा माकणे, मपोह/1424 अंजुम, पोकों/1926 महेश चव्हाण, पोकों/1619 अंगद घोडके व पोकों/2222 सुनिल गवळी यांचा समावेश होता.