Pune Red Alert भारतीय हवामान विभागाने दिलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील २४ तास महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी, प्रशासनाने अलर्ट केल्या
महाराष्ट्रातील पुणे घाट भागाला हवामान विभागाचा रेड अलर्ट
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील घाटमाथा भागात सर्वाधिक पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार पाऊस व सतत पाऊस पडत असल्यामुळे भूस्खलनाचा धोका वाढण्याची देखील शक्यता आहे. त्याचमुळे प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवली आहे , धोकादायक ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांना स्थलांतरित करण्याची तयारी देखील करण्यात आली आहे.
Mumbai, Konkan, Vidarbha on Orange Alert
कोकण, सातारा, कोल्हापूर घाट भागात ऑरेंज अलर्ट
Photo – MAHADGIPR
पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यातील जिल्ह्यांसह सातारा घाट व कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर येण्याची तसेच काही खालच्या भागात पाणी साचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
विदर्भातही पावसाचा जोर कायम
यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे. या भागात आधीच मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली असल्याने जिल्हा प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
हवामान विभागाचा मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला
या कालावधीत अरबी समुद्र व किनारपट्टीवरील भागांमध्ये समुद्र खवळलेला राहणार असून ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे मच्छिमारांनी पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचे आवाहन राज्य आपत्कालीन विभागाने केले आहे
नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
भारतीय हवामान विभागाकडून १७ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात असून . येत्या काही दिवसात नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, धरणे व नद्यांच्या पाणलोट क्षेत्राजवळ जाऊ नये, त्याचबरोबर प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढल्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना सुरू केल्या असून, आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.