हायवेवर अग्नितांडव; गोकर्णला जाणाऱ्या खासगी बसला भीषण अपघात, 17 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर कर्नाटकातील हिरियुर तालुक्यातील गोरलट्टू गावाजवळ मंगळवारी पहाटे भीषण रस्ता अपघात झाला. बेंगळुरूहून गोकर्णाकडे जाणाऱ्या एका खासगी बसला समोरून आलेल्या लॉरीची जोरदार धडक बसली. या धडकेनंतर बसला तात्काळ आग लागली आणि अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण बस जळून खाक झाली. या दुर्घटनेत 17 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now


मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा हिरियुरहून बेंगळुरूकडे जाणारी एक लॉरी नियंत्रण सुटून रस्ता दुभाजक ओलांडत विरुद्ध लेनमध्ये शिरली. त्याच वेळी समोरून येणाऱ्या गोकर्णाकडे जाणाऱ्या बसला लॉरीची समोरासमोर धडक बसली. धडक इतकी तीव्र होती की बसने लगेच पेट घेतला. बसमध्ये झोपेत असलेल्या अनेक प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.


या अपघातात गाढ झोपलेल्या किमान दहा प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने हिरियुर आणि चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपघातानंतर नऊ प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बसमधून सुखरूप बाहेर पडत आपला जीव वाचवला. मात्र आगीने काही क्षणांतच उग्र रूप धारण केल्याने इतर प्रवाशांना मदत मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागले.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, महामार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now