Beed crime news पैशांचं आमिष दाखवून बारामतीच्या तरुणीवर अंबाजोगाईत सामूहिक अत्याचार; चौघांवर गुन्हा दाखल

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

बीड | अंबाजोगाई : beed crime
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नृत्याची आवड असलेल्या बारामतीतील एका तरुणीला कलाकेंद्रात काम आणि पैसे मिळतील, असे आमिष दाखवून अंबाजोगाईत आणण्यात आले आणि तिच्यावर beed crime सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी एका महिलेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण घटनेने बीडसह बारामती परिसर हादरून गेला आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, २४ एप्रिल रोजी बदामबाई गोकुळ नावाच्या महिलेने संपर्क साधला होता. अंबाजोगाईतील ‘पायल कलाकेंद्र’मध्ये नृत्यासाठी संधी असून त्यातून पैसेही मिळतील, असे सांगून तिने तरुणीला पाठवण्यास प्रवृत्त केले. नृत्य शिकण्याच्या इच्छेने तरुणी अंबाजोगाईला गेली; मात्र कलाकेंद्रात राहण्यास तिने नकार दिल्यानंतर बदामबाई व तिच्या साथीदारांनी तिच्यावर मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Beed crime यानंतर पीडितेला जबरदस्तीने अंबाजोगाईतील एका लॉजवर नेण्यात आले. तेथे बदामबाईने तिला तीन पुरुषांच्या ताब्यात देऊन निघून गेल्याचे समोर आले आहे. लॉजवर मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्याचारानंतर तिला पुन्हा कलाकेंद्रात आणून सोडण्यात आले आणि वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

घडलेला प्रकार पीडितेने फोनवरून आईला सांगताच आईने तातडीने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका केली आणि तिला बारामतीला परत आणले. त्यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. बीड crime प्राथमिक तपासानंतर हा गुन्हा अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे कलाकेंद्राच्या नावाखाली चालणाऱ्या गैरप्रकारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now