Pradnya Satav Join BJP | भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांचा सूर बदलला, काँग्रेस सोडण्याची तीन मोठी कारणं उघड

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

काँग्रेस विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आज अचानक आपल्या आमदारकीचा राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सुपूर्द करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. विशेष म्हणजे राजीनामा दिल्यानंतर अवघ्या दीड ते दोन तासांत त्यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.

Amazon

Amazon App Player

Download Now

मुंबईत पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रज्ञा सातव यांचे भाजपमध्ये स्वागत केले. या प्रवेशामुळे विधान परिषदेतील काँग्रेसच्या ताकदीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस सोडण्यामागची तीन प्रमुख कारणे स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, दिवंगत राजीव सातव यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करणे, महाराष्ट्राच्या सुरू असलेल्या विकास प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हातभार लावणे आणि कार्यकर्त्यांचा वाढता आग्रह — या तीन कारणांमुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

प्रज्ञा सातव या 2024 मध्ये काँग्रेसकडून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ 2030 पर्यंत असताना देखील त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे विधान परिषदेत काँग्रेसची संख्याबळ घटले असून, विरोधी पक्षनेतेपदावरील पक्षाचा दावा देखील कमकुवत झाल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.

दरम्यान, प्रज्ञा सातव यांच्यासोबत काँग्रेसचे काही तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना सातव म्हणाल्या की, अजूनही अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. वरिष्ठ नेत्यांनी तारीख दिल्यास त्या दिवशी भव्य कार्यक्रम आयोजित करून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घडवून आणला जाईल.

या घडामोडींमुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याचे स्पष्ट होत असून, राज्याच्या राजकारणात पुढील काळात आणखी हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

One thought on “Pradnya Satav Join BJP | भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांचा सूर बदलला, काँग्रेस सोडण्याची तीन मोठी कारणं उघड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now