
Beed Accident : Pali Ghat Crash धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाली घाट परिसरात आज सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात डिझेल टँकर चालकाचा जळून होरपळून मृत्यू झाला. कोळवाडी जवळ असलेल्या वळणावर वेगात असलेला डिझेल टँकर आणि कंटेनर यांची जोरदार समोरासमोर धडक झाली. धडकेचा आवाज प्रचंड मोठा असल्याने काही क्षणातच परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.
धक्क्यानंतर टँकरच्या पुढील भागाला वेगाने आग लागली. काही सेकंदांतच ज्वाळांनी सम्पूर्ण केबिनला वेढा घेतला. आग इतकी भीषण होती की चालकाला बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही आणि तो जागीच जळून खाक झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की टँकरची केबिन क्षणात ज्वालांनी वितळल्यासारखी दिसत होती.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
अपघातानंतर रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली. स्थानिक नागरिकांनी अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती व टँकरमधील डिझेलमुळे ज्वाला वारंवार भडकत होत्या.
अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसले तरी पाली घाटातील धारदार वळणे आणि वेग यामुळे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या भीषण घटनेमुळे स्थानिकांमध्ये तसेच वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण असून पाली घाटातील सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.