Buldhana Accident : अमरावतीतून मजुरीला आलेल्या कष्टकरी महिलांचा दुर्दैवी अंत

Spread the love

दोन जणींचा जागीच मृत्यू, तर पाच जणी गंभीर

Verification: 1fe30fb203b45d5d

बुलढाणा जिल्ह्यातून पुन्हा एकदा हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावती आणि मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागांतून बुलढाण्यात कापूस वेचणीसाठी आलेल्या महिला मजुरांचा प्रवास बुधवारी अकस्मात थांबला. दिवसेंदिवस कुटुंबासाठी हाताला काम मिळावं म्हणून शेकडो महिला बुलढाणा, जाफराबाद परिसरात मजुरीसाठी येतात; मात्र याच प्रवासात दोन महिलांचा मृत्यू झाला, तर पाच जणी मृत्यूशी झुंज देत आहेत.

Amazon

Amazon App Player

Download Now

कापूस वेचणीसाठी आलेल्या महिलांना भरधाव एसटीची धडक

बुधवारी सकाळी जाफराबाद-जालना मार्गावर एक मालवाहू पिकअप (क्रमांक MH 38 E 2082) कापूस वेचणी करणाऱ्या महिलांना घेऊन जात होती. दररोजचा हा त्यांचा नियमित प्रवास… पण आज मात्र दुर्दैव त्यांच्या पाठी लागलं. भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने (क्रमांक MH 20 BL 2276) पिकअपला मागून जोरदार धडक दिली आणि क्षणात सर्वकाही उध्वस्त झालं.

या भीषण धडकेत मायाबाई सुरज काजले (45, रा. बुरहानपूर, मध्य प्रदेश) आणि रिचा कासदेकर (32, रा. अमरावती) यांचा जागीच मृत्यू झाला.

पाच महिला गंभीर जखमी — रुग्णालयात मृत्यूशी झुंज

या अपघातात खालील महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत:

सुहाना प्रतिराम इपने (16), रा. नांदुरी, ता. धारणी

खुशबू बबलू पालवी (17), रा. तागमला, ता. खगनार, जि. बुरहानपूर

सुलोचना हारासिंग सहारे (35), रा. भगवानपुरा, ता. नांदोरी

पुरुषाने मंगल इपने (22), रा. भगवानपुरा, ता. नांदुरी

नर्मदा सोनू इपने (45), रा. नांदुरी, ता. धारणी, जि. अमरावती

या महिलांचा कुटुंबाच्या पोटापाण्यासाठी सुरू असलेला प्रवास एका क्षणात अंधारात बुडाला.

घटनास्थळी धावपळ — पोलीसांनी दाखल केला मर्ग

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी पथकासह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करण्यात आला असून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासानंतर संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची माहितीही पोलीसांकडून देण्यात आली.

कष्टकरी महिलांचा शेवटचा प्रवास…

कापूस वेचून दिवसाची मजुरी मिळवण्यासाठी रोजचा प्रवास करणाऱ्या या महिलांना आपल्या घरच्यांची हजारो स्वप्नं पूर्ण करायची होती. पण भरधाव धडकेने हा प्रवासच त्यांच्या आयुष्याचा शेवट ठरला. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ही घटना पुन्हा एकदा ग्रामीण कामगारांच्या वाहतुकीतील सुरक्षेचे प्रश्न उभे करणारी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now