महाराष्ट्र सरकारने २०२६ सालातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली असून यावर्षी नागरिकांना एक अतिरिक्त सुट्टी मिळणार आहे. विशेष म्हणजे ११ नोव्हेंबर २०२६ रोजी भाऊबीजेच्या दिवशी प्रथमच सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

वर्षभरात मिळणार २४ सार्वजनिक सुट्ट्या
सरकारने जाहीर केलेल्या यादीप्रमाणे २०२६ मधील पहिली सार्वजनिक सुट्टी २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन, तर शेवटची सुट्टी २५ डिसेंबर – ख्रिसमस असेल. राज्यातील शासकीय कार्यालये, महापालिका, जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांना या सुट्ट्या लागू राहतील.
बँकांसाठी वेगळी सुट्टी
बँकांना वार्षिक खात्यांची ताळमेळ प्रक्रिया पार पाडता यावी यासाठी १ एप्रिल २०२६ रोजी स्वतंत्र सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे. ही सुट्टी फक्त बँकांसाठीच लागू राहील.
महाराष्ट्रातील २०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची संपूर्ण यादी
२६ जानेवारी (सोमवार) – प्रजासत्ताक दिन
१५ फेब्रुवारी (रविवार) – महाशिवरात्री
१९ फेब्रुवारी (गुरुवार) – छत्रपती शिवाजी महाराज जयंती
३ मार्च (मंगळवार) – होळी (दुसरा दिवस)
१९ मार्च (गुरुवार) – गुढीपाडवा
२१ मार्च (शनिवार) – रमझान ईद
२६ मार्च (गुरुवार) – रामनवमी
३१ मार्च (मंगळवार) – महावीर जयंती
३ एप्रिल (शुक्रवार) – गुड फ्रायडे
१४ एप्रिल (मंगळवार) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
१ मे (शुक्रवार) – महाराष्ट्र दिन
१ मे (शुक्रवार) – बुद्ध पौर्णिमा
२८ मे (गुरुवार) – बकरी ईद
२६ जून (शुक्रवार) – मोहरम
१५ ऑगस्ट (शनिवार) – स्वातंत्र्य दिन
१५ ऑगस्ट (शनिवार) – पारशी नववर्ष
२६ ऑगस्ट (बुधवार) – ईद-ए-मिलाद
१४ सप्टेंबर (सोमवार) – गणेश चतुर्थी
२ ऑक्टोबर (शुक्रवार) – महात्मा गांधी जयंती
२० ऑक्टोबर (मंगळवार) – दसरा
८ नोव्हेंबर (रविवार) – दिवाळी (लक्ष्मीपूजन)
१० नोव्हेंबर (मंगळवार) – दिवाळी (बलिप्रतिपदा)
११ नोव्हेंबर (बुधवार) – भाऊबीज – अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी
२४ नोव्हेंबर (मंगळवार) – गुरुनानक जयंती
२५ डिसेंबर (शुक्रवार) – ख्रिसमस
भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी – कोणाला लागू?
भाऊबीजेचा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी ११ नोव्हेंबर रोजीची अतिरिक्त सुट्टी खालील सर्वांनाच लागू राहील—
राज्य शासनाची सर्व शासकीय कार्यालये
शासनाचे उपक्रम
महापालिका व नगर परिषद
नगर पंचायत
जिल्हा परिषद व पंचायत समित्या
ग्रामपंचायत
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचारी, कामगार आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. २०२६ सालात अधिक नियोजनबद्ध पद्धतीने सुट्ट्या घालवण्याची संधी यामुळे मिळणार आहे.