बॉलिवूडमधील चर्चा सध्या एका नावाची… धुरंधर. रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा रिलीज झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर सुसाट धावताना दिसतोय. विकेंडला जबरदस्त कमाई केल्यानंतर, सर्वांचे लक्ष लागले होते ते सोमवारी या चित्रपटाची ‘मंडे टेस्ट’ कशी होते याकडे. आणि अगदी तिथेही ‘धुरंधर’नं कमाईचा ठसा उमटवत पास झालाय.

SACNILC च्या अहवालानुसार, धुरंधरनं चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी 23 कोटी रुपये कमावले. रिलीजच्या फक्त तीन दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केलेल्या या सिनेमाची एकूण कमाई आता 126 कोटी रुपये झाली आहे.
अशा वेगानं कमाई सुरू राहिली, तर मंगळवारी हा सिनेमा 150 कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल, अशी पूर्ण शक्यता आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
सलमान खानचा ‘सिकंदर’ मागे
फक्त चार दिवसांत ‘धुरंधर’नं सलमान खानच्या सिकंदरला मागे टाकलं आहे. बॉलिवूड ट्रेड रिपोर्टनुसार:
सिकंदरचा लाइफटाइम कलेक्शन : 103.45 कोटी
भारतातील कलेक्शन : 122.14 कोटी
आणि इथे ‘धुरंधर’नं 126 कोटींसह हा रेकॉर्ड चार दिवसांतच ओलांडला. पुढे हा वेग कायम राहिला, तर सिनेमा वर्षातील टॉप ग्रॉसर्समध्ये स्थान घेईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.
अक्षय खन्नाची वाहवा
जरी रणवीर सिंह या चित्रपटाचा पोस्टर फेस असला, तरी सिनेमानंतर प्रेक्षकांच्या चर्चेतला खरा हिरो आहे अक्षय खन्ना.
त्याचे डायलॉग्स कमी असले, तरी चेहरेवरील एक्सप्रेशन्स आणि डोळ्यांतून दिसणारा अभिनय यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सोशल मीडियावर अक्षय खन्नाची एंट्री, त्याची वॉचफुल बॉडी लँग्वेज, शांत पण प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स यावर प्रशंसेची बरसात होत आहे.
रणवीर सिंहचा जंगी कमबॅक
बर्याच काळानंतर रणवीर सिंह मोठ्या पडद्यावर दिसला आणि चाहत्यांनी अक्षरशः सिनेमागृहात धाव घेतली. त्याची एनर्जी, अॅक्शन आणि स्क्रीनवरील कमांड पाहण्यासाठी थिएटर्समध्ये गर्दी वाढत आहे.
चित्रपटात आर. माधवन, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांच्या भूमिका सिनेमाला अधिक उंची देतात.
20 वर्षांची सारा अर्जुन मात्र या साऱ्यात सरप्राईज पॅकेज ठरली. तिच्या भूमिकेवरही प्रचंड कौतुक होत आहे.
पुढे कोणते रेकॉर्ड मोडणार?
पहिल्या चार दिवसांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतंय की धुरंधरला सध्या कोणतीही स्पर्धा नाही. प्रेक्षकांची गर्दी, पॉझिटिव्ह वर्ड ऑफ माउथ आणि मल्टीस्टारकास्टमुळे सिनेमाची कमाई पुढील आठवड्यात आणखी वेग पकडू शकते.
आता प्रश्न एकच —
धुरंधर कोणत्या इतर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार?
बॉक्स ऑफिसच्या आकड्यांवर सर्वांची नजर स्थिरावली आहे.