
मुंबई – अक्षय खन्ना (Akshaye Khanna), रणवीर सिंह (Ranveer Singh), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अर्जुन रामपाल (Arjun Rampal) यांच्या दमदार अभिनयासह ‘धुरंधर’ (Dhurandhar) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलिजच्या अवघ्या चार दिवसात या चित्रपटाने 100 कोटी कमाईचा टप्पा पार केला आहे.
सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे अक्षय खन्नाच्या भूमिकेवर आधारित Fa9la गाण्यावरचा त्याचा नाटकी डान्स. चित्रपटात अक्षय खन्ना पाकिस्तानी अंडरवर्ल्ड डॉन रेहमान डकैत (Rehman Daku)च्या भूमिकेत दिसतो आणि एका स्वागत सोहळ्यात तो या गाण्यावर डान्स करताना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. अक्षयच्या चेहऱ्यावरच्या हास्याने आणि त्याच्या अभिनयाने हे सीन अत्यंत आकर्षक बनले आहे. प्रेक्षकांनी या डान्सची तुलना बॉबी देओलच्या ‘जमाल कुडू’ (Jamal Kudu) सीनशी केली आहे, जो ‘एनिमल’ (Animal) चित्रपटात चर्चेत आला होता.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
या गाण्याचा जन्म बहरीन (Bahrain) देशात झाला आहे. बहरीनच्या रॅपर Flipperachi ने हे गाणं लिहिलं आणि गायले आहे. 6 जून 2024 रोजी Flipperachi च्या यूट्यूब (YouTube) चॅनलवर हे गाणं अपलोड करण्यात आले. गाण्याचा प्रोडक्शन आणि मिक्स DJ Outlaw ने केले आहे. बातमी लिहिताना यूट्यूबवर Fa9la गाण्याचे 72 लाख हिट्स (views) नोंदले आहेत.
Fa9la हा अरबी (Arabic) शब्द असून, कथितरित्या याचा उच्चारण ‘Fasla’ असा होतो. हा शब्द फन टाइम (Fun Time) किंवा पार्टी (Party) साठी वापरला जातो. बहरीन भारतापासून सुमारे 2400 किलोमीटर दूर असून, या गाण्यामुळे अक्षय खन्ना सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.
हा गाणा आता ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral) झाला असून प्रेक्षक आणि संगीतप्रेमी (Music Lovers) याच्या डान्स आणि बीटवर आनंद घेत आहेत.