Beed Crime बीड जिल्हा हादरला : ग्रामपंचायतीच्या शिपाईयावर गावगुंडांचा हल्ला, एक पाय फ्रॅक्चर

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी घटना घडली आहे. नांदलगाव येथे ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या शिपाईवर गावातील आठ ते दहा जणांनी एकत्र येत निर्घृण मारहाण केली. लाकडी दांडे, काठ्या आणि लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीमध्ये शिपाई जखमी झाला असून, त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाल्याचे समजते.

Amazon

Amazon App Player

Download Now

गंभीर जखमी शिपाई जालिंदर सुरवसे यांच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरवसे यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे, काही संशयावरून गावगुंडांनी हे कृत्य केल्याचे सांगितले. महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करत त्यांच्यावर हल्ला चढवण्यात आला. मात्र नेमकं काय घडलं, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सुरवसे यांना काठ्या, रॉड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितलं. घटनेनंतर नांदलगाव आणि आसपासच्या भागात तणावाचे वातावरण आहे. जखमी शिपाई आणि त्यांचे नातेवाईक यांनी आपल्याला जीवाचा धोका असल्याचे पोलिसांना सांगितले असून, हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे.

गावपातळीवर हिंसाचाराच्या घटना वाढत असताना प्रशासन आणि पोलिसांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरवसे यांच्यावर उपचार सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

One thought on “Beed Crime बीड जिल्हा हादरला : ग्रामपंचायतीच्या शिपाईयावर गावगुंडांचा हल्ला, एक पाय फ्रॅक्चर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now