
वैजापूर–गंगापूर रोडवरील जाकमाथावाडी शिवारात शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. दोन कार आणि मोटारसायकलच्या झालेल्या विचित्र धडकेत आठ जण जखमी झाले असून, दोन्ही कार अक्षरशः चेंदामेंदा झाल्या आहेत.
घटना दुपारी साधारण १ वाजेच्या सुमारास घडली. वैजापूरकडून गंगापूरकडे जात असलेली कार (एमएच ०६ एझेड ७७७०) येत असताना समोरून ओव्हरटेक करत आलेल्या कारने (एमएच ०४ डीएन ७१७४) जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
दरम्यान, वैजापूरकडून येत असलेल्या मोटारसायकलने (एमएच २० डीएक्स २४४९) अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेक मारताच तिचे नियंत्रण सुटले आणि मोटारसायकल थेट कारवर आदळली. या धडकेत मोटारसायकलवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले.
जखमींमध्ये —
अमरसिंग भय्यासिंग बगेल (६०), विजया अमरसिंग बगेल (५५), सौरभ अमरसिंग बगेल (२८) – पीडब्ल्यूडी वसाहत, गंगापूर
बिलाल इकबाल पठाण (२०), फैजल अन्सार शहा (२९), मुस्तकीन बाबू शहा (२३) – गंगापूर
दादासाहेब मारुती साळुंके (६३), मीनाबाई दादासाहेब साळुंके (५८) – रा. सिरसगाव, ता. वैजापूर
घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे दाखल करण्यात आले. तेथे डॉ. चव्हाण, डॉ. आसेफा आणि डॉ. वालतुरे यांनी प्राथमिक उपचार केले. त्यापैकी पाच जणांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले असून उर्वरित तिघांवर गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.