परभणी /
सेलू व मानवत तालुक्यातील ५४ गावांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर या गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर जिंतूर तालुक्यातील गावांना पुर्णा प्रकल्पातून पाणी देण्यासाठीही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या दोन्ही मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी दिली.
पुर्णा प्रकल्पामध्ये येलदरी व सिध्देश्वर ही दोन धरणे असून धरणांचे बांधकामाची सुरवात सन १९५८ झाली होती: तसेच १९६८ मध्ये पूर्ण होऊन १ जानेवारी १९६९ पासून पुर्णाप्रकल्प पाणीसाठा करून सिंचन करण्यास सुरवात झाली. पुर्णाप्रकल्प मधील मुख्य धरण येलदरी येथे असुन त्याची जिवंत पाणी साठवण क्षमता 33 टीएमसी आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
येलदरी धरणातुन सोडलेल्या पाण्याद्वारे विद्युत निर्मिती होऊन पुढे 65 कि.मी. अंतरावर सिध्देश्वर येथे धरण (पिकअप वेअर) बांधुन पाणी अडविण्यात आले आहे. सिध्देश्वर धरणातील एकुण साठवण क्षमता 8.86 टीएमसी आहे. वरील प्रमाणे येलदरी व सिध्देश्वर दोन्ही धरणाचा मिळुन पुर्णा प्रकल्पाचा एकुण वापरण्या योग्य पाणी साठा 31.46 टीएमसी इतका आहे.
पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी जिंतूर तालुक्यातील अवर्षण भागातील तसेच सिंचनाच्या अल्प सोयी असलेल्या गावातील शेतकारी, उद्योजक यांची शेती तसेच लघु उद्योग यांची मागील ५० वर्षांची मागणी लक्षात घेत जिंतूर तालुक्याच्या उशाशी असलेल्या येलदरी धरणावरून पाणी उपसा करून आण्यासाठी आग्रही मागणी शासन दरबारी लाऊन धरली आहे. यासाठी दि.१२ ऑगस्ट २०२२, दि.०७ डिसेंबर २०२२ व दि.०९ ऑगस्ट २०२३ रोजीच्या पत्राद्वारे जिंतूर तालुक्यातील केहाळ, सावंगी (म्हा.), हिवरखेडा, जोगी तांडा, सावळी, घडोळी, घेवडा, मांडवा, इटोली, चारठाणा, भोसी, शेवडी, वाघी धानोरा, आडगाव बाझार, वस्सा, कारंजी, कुऱ्हाडी, दहेगाव, कावी, बोर्गीळवाडी, ब्राम्हणगाव ई. या गावांना येलदरी धरणातून उपसा योजना राबवून सिंचनाचा लाभ मिळणे बाबत मागणी करण्यात आली आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
पालकमंत्री मेघना -साकोरे-बोर्डीकर यांच्या पाठपुराव्याने दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील भेटीदरम्यान उपसा योजनेला गती देण्याबाबत बैठक पार पडली. यामध्ये उपसा योजनेसाठी आवश्यक पाणीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा करून तसा प्रस्ताव शासनास पाठविण्याबाबत साकारात्मंक चर्चा करण्यात आली.
बैठकीतील आदेशान्वये शासन स्तरावरून एजन्सी नेमून सर्वे करण्यात येत आहे, यामुळे 200 गावे आणि 3000 शेतकरी यांना फायदा होऊन 10 हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे .त्यानुसार वरील गावांमध्ये धरणापासून असलेले अंतर, सध्या अस्तित्वातील सिंचन सुविधा व उपसासिंचन योजनेचे व्यवहारीता नुसार गावातील सर्वेक्षण करून त्यानुसार प्रस्ताव सादर करणे बाबत सर्वेक्षण पूर्णा पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येत आहे. प्रकल्प अधिकारी गावांनी भेटी देऊन प्राथमिक माहिती गोळा करून त्यानुसार सविस्तर सर्वेक्षण व पाण्याची उपलब्धता याबाबत लवकरच अहवाल सादर करण्यात येणार आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने पत्र दि.०३ जानेवारी २०२५ नुसार जिंतूर तालुक्यातील प्रस्तावित उपसा सिंचन योजना हाती घेणे शक्य असल्याने धोरणात्मक निर्णयास्तव शासनास कळविण्यात आलेले आहे. तसेच जलसंपदा मंत्री (कृष्णा व गोदावरी खोरे महामंडळ ) यांच्या अध्यक्षतेखाली दि.४ जून २०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येते संपन्न झालेल्या आढावा बैठकीत पुर्णा प्रकल्पातून नवीन योजना प्रस्तावित करण्यापूर्वी पाणी उपलब्धता तपासणी आवश्यक असल्याने प्रथमतः पुर्णा प्रकल्पाचे फेर नियोजन शासन मान्यतेस्तव सादर करावे, अश्या मंत्री महोदयांनी सुचना केलेल्या आहेत. पुर्णा प्रकल्पाचे फेर नियोजन प्रस्ताव मान्यतेच्या पुढील कार्यवाहीस्तव सादर करण्यात आले असून लवकरच यास मंजुरी मिळणे अपेक्षित आहे.
येणाऱ्या काळात हे प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास कोरडवाहू भागातील पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे आर्थिक चित्र बदलण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.