mhada ची घरं घेण्याची मोठी संधी; 84 अनिवासी गाळ्यांच्या विक्री प्रक्रियेला सुरूवात

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

मुंबई : मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 84 अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलावाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या लिलावासाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार असून इच्छुकांना 21 डिसेंबर 2025 रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

मुंबईतील मुलुंड गव्हाणपाडा (4), कुर्ला–स्वदेशी मिल (5), कोपरी पवई (15), जोगेश्वरी पूर्व मॉडेल टाऊन मजासवाडी (1), गोरेगाव सिद्धार्थ नगर (1), बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व (17), मालवणी मालाड (29) आणि चारकोप (12) या ठिकाणी असलेले गाळे लिलावासाठी उपलब्ध आहेत.

संकेतस्थळावर नोंदणी, ऑनलाइन अर्ज, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि ऑफसेट किंमतीनुसार अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जदार ई-लिलावात सहभागी होऊ शकतील. अर्ज करताना अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आणि महाराष्ट्रातील 2018 नंतर जारी केलेले अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे.

ई-लिलाव 23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान www.eauction.mhada.gov.in या पोर्टलवर पार पडणार आहे. त्यानंतर 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर केला जाईल.

लिलावातील पात्रता निकष, गाळ्यांची तपशीलवार माहिती, आरक्षण, अर्ज प्रक्रिया, अटी व शर्ती आणि माहिती पुस्तिका याबाबत सर्व माहिती mhada च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. इच्छुकांनी सर्व नियम व सूचना नीट वाचूनच अर्ज करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now