परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा(टीईटी) परभणी जिल्ह्यात सकाळ व दुपार सत्रात रविवारी(दि. २३)सुरळीत व शांततेत पार पडली. यंदा विक्रम ९४% परीक्षार्थी उपस्थित होते.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
परभणी जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सकाळच्या सत्रात पेपर – १ साठी १६ विविध केंद्रांवर ४ हजार ९४८ परीक्षार्थींपैकी तब्बल ४ हजार ६४१ एवढ्या परीक्षार्थींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. ज्याची टक्केवारी ९३.८% एवढी आहे. तर पेपर क्रमांक – २ साठी शहरात विविध २० केंद्रांवर दुपारच्या सत्रात ६ हजार १०९ परीक्षार्थींपैकी तब्बल ५ हजा र७६७ परीक्षांर्थींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. याची टक्केवारी ९४.४% एवढी आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
शिक्षक पात्रता परीक्षा दरम्यान जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, परीक्षेचे राज्य निरीक्षक मिनाक्षी राऊत, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे – वाडियार यांनी शहरातील विविध परीक्षा केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या परीक्षेसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनिल पोलास यांनी परीक्षा सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली. सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी समन्वय अधिकारी म्हणून, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांनी सहाय्यक परिरक्षक म्हणून तर मंगेश नरवाडे यांनी जिल्हा परिरक्षक म्हणून काम पाहिले.