
परभणी /
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करणार्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी परभणीत सुवर्णकार समाज बांधव , भगवाधारी मित्र मंडळ
यांच्यासह आमदार डॉ राहुल पाटील यांच्या समर्थक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
डोंगराळे गावातील चार वर्षाच्या लहान मुलीवर बलात्कार करून अमानुषपणे हत्या करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना असून या घटनेतील आरोपीला फाशी शिक्षा व्हावी, जलद गतीने खटला चालवावा, कायद्यात फेरबदल करून कठोर कायदा निर्माण करावा, मुलीच्या कुटुंबाला शासकीय आर्थिक मदत द्यावी, सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, पीडितेच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे, यापुढे भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी कठोर कायदा निर्माण करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन पाठवण्यात आले आहे.
निवेदनावर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख सौ. अंबिका डहाळे, नरहरी संस्थानचे अध्यक्ष दिनेश डहाळे, गोविंद अंबिलवादे, अशोक डहाळे, सचिन अंबिलवादे, विशू डहाळे, गणेश टाक, दीपक टाक, किरण वाघाळकर, ओंकार शहाणे, रणजिकांत डहाळे, अमोल कुलथे, अजय शहाणे, सतीश टाक, संतोष डहाळे, नाना मैड, राजू शहाणे, गोविंद डहाळे, लक्ष्मीकांत बागडे, रामकृष्ण शहाणे, शरद शहाणे, विजय शहाणे, कांता बोकण, तानाजी शहाणे, प्रमोद पेडगांवकर, मिलींद शहाणे, संध्या शहाणे, संगीता टेहरे, वंदना कदम, सूचित्रा शहाणे, सीमा टाक, सपना शहाणे, राखी अंबिलवादे यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.