बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांना आज तत्काळ निलंबित करण्यात आल्याने संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकांच्या संच मान्यतांसाठी मागील तारखांनी मंजुरी देताना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याची गंभीर तक्रार शिक्षण विभागाकडे आली होती. या संदर्भातील काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला वेग आला. संबंधित क्लिप्समध्ये “एसआयटी मॅनेज केली” अशा स्वरूपाचे दावे ऐकू येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या विश्वसनीयतेला अधिक बळ मिळाले.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
तक्रारींची पडताळणी आणि प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर शिक्षण विभागाने दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे पाऊल उचलले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे बीडच्या शिक्षण विभागात एकच खळबळ माजली असून, शिक्षक संघटना आणि शिक्षण क्षेत्रातील विविध गटांमध्ये चर्चांची जोरदार धग दिसून येत आहे.
दरम्यान, व्हायरल ऑडिओ क्लिप्सची स्वतंत्र तपासणी करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती विभागातील सूत्रांनी दिली. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी काही महत्त्वाच्या बाबी पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.