परभणीच्या डॉ. प्रफुल्ल पाटील आयुर्वेद मेडीकल महाविद्यालयामध्ये पहिल्या वर्षी १०० विद्यार्थी प्रवेशित

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

Amazon

Amazon App Player

Download Now

परभणी /
SDMSOC फाउंडेशन संचलित डॉ. प्रफुल्ल पाटील आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्रात बी.ए.एम.एस. प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी उत्साहात स्वागत करण्यात आले.
परभणी शहरातील हे पहिलेच आयुर्वेद महाविद्यालय असून ,
NABH accredited १०० खाटांचे आयुर्वेद रुग्णालय या आयुर्वेद रुग्णालयास संलग्नित आहे.


डॉ. प्रफुल्ल पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय व संशोधन केंद्र, परभणीत बी.ए.एम.एस. प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या नव्या विद्यार्थ्यांचा “आयुरप्रवेशिका — WHITE COAT CEREMONY” व स्वागत समारंभ अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडला.
विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी 100 टक्के विद्यार्थ्यांची हजेरी व पालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पहावयास मिळाला.

कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. सौ.विद्या पाटील, मुंबईचे प्रख्यात युरोलॉजिस्ट व संस्थेचे ट्रस्टी डॉ. अजिंक्य पाटील, डॉ. सौ .जान्हवी अजिंक्य पाटील व
डॉ. तरल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व धन्वंतरी स्त्वनाने झाली.तसेच गुलाब पुष्प देऊन नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी मार्गदर्शनपर भाषणात डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, सातत्य आणि जीवन संघर्षातूनच यश मिळते यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
आयुर्वेदाचे वाढते वैश्विक महत्व पाहता केंद्र शासन व राज्य शासनाने आयुर्वेद शिक्षणासाठी मागील दहा वर्षात विशेष पाऊले उचलली आहेत, महाराष्ट्रात बी ए एम एस डॉक्टर्सना व्यवसाय करण्यासाठीच्या मुभा महाराष्ट्र शासनाने दिल्या असून केंद शासनही आयुर्वेदाचा व भारतीय संस्कृतीचा प्रचार व प्रसार भारतात होऊन, अख्या विश्वात होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत.
संशोधन, औषधी वनस्पती, आयुष हॉस्पिटल्स आणि निर्यातक्षेत्रातील नव्या संधींमुळे आयुर्वेदिक तज्ज्ञांची मागणी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आरोग्य क्षेत्रात भारतीय आयुर्वेद महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले
अशा पार्श्वभूमीवर पुढील दोन ते तीन दशकात भारतातील आयुर्वेद डॉक्टरांची मागणी आख्या जगात प्रचंड प्रमाणात होईल असे प्रतिपादन डॉ पाटील यांनी केले.


.
डॉ. विद्या पाटील यांनी विनम्रता, प्रामाणिकपणा व माणुसकी ही विद्यार्थी जीवनातील आवश्यक मूल्ये असल्याचे सांगितले.
मुख्य अतिथी डॉ. अजिंक्य पाटील यांनी सातत्यपूर्ण अभ्यास व शिकण्याची वृत्ती हा यशाचा खरा मंत्र असल्यावर भर दिला.
डॉ. जान्हवी पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्कार, शिस्त व ज्येष्ठांचा आशीर्वाद यांचे महत्त्व प्रभावी शब्दांत कथन केले.
डॉ. तरल पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी परामर्श दिला.

या प्रसंगी
डॉ. प्रफुल्ल पाटील एज्युकेशनल कॅम्पसच्या CEO डॉ.उज्वला माखने डेंटल कॉलेज च्या अधिष्ठाता डॉ मंगला राकरेड्डी कॅम्पस वॉर्डन व उप अधिष्ठाता डॉ. अर्चना जटानीया
डॉ. विनिता मुरगूड, डॉ. पल्लवी दाशेटवार,डॉ. रेनू पांडे, आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉ. नंदलाल कुंदनानी ,व्हाईस प्रिन्सिपल डॉ. भक्ती खरात, व्यवस्थापकीय अधिकारी डॉ. स्नेहश्री जाधव , डॉ अशोक कामथे, डॉ. अश्विनी जैस्वाल, डॉ. सुर्वे, डॉ . रुही खान,डॉ धनश्री शेळके, डॉ मुंजा गोरे, डॉ. असीमा, डॉ. प्रीती होळकर, डॉ माने
डॉ. सौरभ बरकुले व BAMS कॉलेजचे सर्व प्राध्यापक, तसेच
प्रभाकर जारे , अनंत मिलखे, पवन मिलखे, विनय मिलखे, अशोक तळेकर, डॉ. किरण सोनटक्के, डॉ. अमिना व इतर मान्यवर उपस्थित होते.
WHITE COAT CEREMONY दरम्यान विद्यार्थ्यांनी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून जीवन समर्पित करण्याची नैतिक शपथ घेतली व त्यांच्या पांढऱ्या कोटात मंचावर सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संपूर्ण व्यवस्थापन अत्यंत सुव्यवस्थित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now