आठवड्याच्या सुरुवातीला सोनं आणि चांदीचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. पण मंगळवारी सराफा बाजारात सोन्याने पुन्हा उसळी घेतली असून एका दिवसातच बाजाराचे चित्र बदलले आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
सोमवारी सोनं-चांदीचे दर कमी झाल्याने लग्नसराईमध्ये खरेदी करणाऱ्यांचा ताण काहीसा कमी झाला होता. मात्र, आज पुन्हा दर वाढताना दिसत आहेत. वधू-वरांच्या खरेदीचा हंगाम आणि बाजारातील मागणी वाढल्याने सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली आहे.
वायदे बाजारातील स्थिती
वायदे बाजारात मात्र सोनं-चांदीने कमजोरी दाखवली आहे.
सोन्याचा वायदा भाव: ₹1,22,966
→ दिवसभरात ₹595 ने घसरला
चांदीचा वायदा भाव: ₹1,55,400 प्रति किलो
→ दिवसभरात ₹618 ने घट
वायदे बाजारातील घट असूनही सराफा बाजारात सोन्याची उलट वाढ झाल्याने व्यापारीही आश्चर्य व्यक्त करत आहेत.
सराफा बाजारातील आजचे दर
लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने सोन्याची मागणी वाढली आहे आणि त्याचा थेट परिणाम सराफा बाजारावर दिसून आला.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
22 कॅरेट सोनं: ₹1,14,960 (10 ग्रॅम)
24 कॅरेट सोनं: ₹1,25,610 (10 ग्रॅम)
काल कमी झालेल्या किमती आज पुन्हा वाढल्याने ग्राहकांना किती आणखी वाढ होईल याकडे लक्ष आहे.
आंतरराष्ट्रीय बाजाराचा कल
स्पॉट गोल्ड: $4,077.35 प्रति औंस – स्थिर
स्पॉट सिल्वर: $50.89 प्रति औंस – 0.66% वाढ
जागतिक बाजारातील स्थिरतेचे कारण डॉलरची मजबूती आणि आशियातील भू-राजकीय संकेत असल्याचे मिरे अॅसेट शेअरखानचे कमोडिटी प्रमुख प्रवीण सिंग यांनी सांगितले.
त्यांच्या मते, डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या वाढीवर मर्यादा आल्या, तर चीन–जपान तणावामुळे सोन्याचा भाव मोठ्या घसरणीपासून वाचला.
लग्नसराईसोबत स्थानिक मागणीत सुधारणा होत असल्याने सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्राहकांच्या नजरा आता दर किती वाढतात याकडे लागल्या आहेत.