माजलगावात छ.शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे भुमिपुजन
माजलगाव / दर्शन डोंगरे
राजकारणांत समोरा – समोर लढु परंतु सामाजिक प्रश्नी कायम सर्वांसोबत असल्याचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगीतले. शहरातील नविन बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे तर जुन्या बसस्थानकामध्ये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होणार असुन या स्मारकाच्या भुमिपुजन कार्यक्रमात दि. 10 शुक्रवारी ते बोलत होते.अध्यक्षस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे तर उद्घाटक म्हणुन आमदार प्रकाश सोळंके होते. या कार्यक्रमास माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, बाबुराव पोटभरे, अच्युत लाटे, दयानंद स्वामी, उपसभापती श्रीहरी मोरे, जयसिंह सोळंके, विरेंद्र सोळंके, खुर्शिद नाईक, सभापती जयदत्त नरवडे, विजय साळवे, अविनाश जावळे, डॉ. अशोक तिडके, खलील पटेल, कचरू खळगे, नासेर पठाण, सुरेंद्र रेदासनी नवनाथ धाईजे, अभिजित पोटभरे, अभय होके पाटील, भिमराव टाकणखार, अरूण राउत, अर्जुन नाईकनवरे, धम्मानंद साळवे, भास्कर शिंदे, राजेश साळवे, अमोल शेरकर, संतोष जेथलिया ईश्वर खुरपे सिध्दार्थ ससाणे, राकेश साळवे, दिनकर शिंदे, उमेश मोगरेकर, कमलेश जाब्रस विलास नेमाणे, विठ्ठल तुपसौंदर, अभिजित कोंबडे, आगार प्रमुख सुहास कोळपकर मुख्याधिकारी पोपट निघळ यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना आ. सोळंके म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व दोन्ही चौकांचे सुशोभिकरण दर्जेदार करण्यात येणार आहे असे सांगीतले तर बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी सांगीतले की, महापुरूषांचे स्मारक यातुन त्यांची प्रेरणा मिळते. हे दोन्ही स्मारक माजलगावकरांच्या अस्मितेचा प्रश्न होता. मार्गी लागला यामागे सर्व माजलगावकरांचे श्रेय आहे. यावेळी माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील यांनी 1978 पासुन या दोन्ही स्मारकांच्या पाठपुराव्याचा आलेख सर्वांसमोर मांडला तर यावेळी विजय साळवे, अविनाश जावळे, दयानंद स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन धनंजय सोळंके तर आभार तालुकाप्रमुख तुकाराम येवले यांनी मानले माजलगाव मतदारसंघामध्ये नगरविकास खात्यामार्फत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी भरिव निधी दिलेला असल्याने मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत. शहरामध्ये होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य – दिव्य स्मारकांकरीता ना. एकनाथराव शिंदे यांचेकडुन मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यात येईल. आगामी नगरपालिका निवडणुकीत माजलगाव नगरपालिकेचे नगराध्यक्षपद शिवसेनेसाठी सोडावे असेही शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी सांगितले
शहरातील जुन्या बसस्थानकात भव्यदिव्य असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होणार असनु नविन बस्थानकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होणार आहे. या स्मारकाच्या भुमिपुजनाचे आयोजन शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम येवले, धनंजय सोळंके, अभिजित कोंबडे यांनी केले होते.