बीड :
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूअअसल्यामुळे , हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच अंगणवाडी केंद्रांना 23 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार बीड जिल्ह्यात 22 सप्टेंबरपासून मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नद्या-नाले तुडुंब भरले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात आलेल्या आदेशानुसार, ही सुट्टी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लागू राहणार आहे. यामध्ये शासकीय, निमशासकीय, खासगी, अनुदानित आणि विनाअनुदानित सर्व शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. अगदी अंगणवाड्या, नगरपरिषद व ग्रामपंचायत शाळाही यामध्ये येणार आहेत.
प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तास अतिवृष्टीचा धोका कायम असल्याने, अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. तसेच नदी, नाले व धरण परिसरात जाण्याचे टाळावे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
बीड चे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले की, “पूरपरिस्थितीवर प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे. जनतेने घाबरून न जाता सतर्कता बाळगावी. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.”
यामुळे उद्या 23 सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद राहणार आहेत.
नागरिक व विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.