Majalgaon Dam: माजलगाव धरणातून ७१,२४८.९३ क्युसेक पाण्याचा विसर्ग ; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

बीड :
मराठवाड्यात सुरू असलेल्या सलग पावसाच्या पार्श्वभूमीवर माजलगाव प्रकल्प प्रशासनाने सोमवारी (१५ सप्टेंबर २०२५) सायंकाळी ५ वाजता धरणातील विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली असून धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Amazon

Amazon App Player

Download Now

मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव धरणाचे वक्रद्वार क्रमांक ११, ६, १६, १०, १२, ९, १३, ८ आणि १४ अशी एकूण ९ गेट्स आणखी ०.५० मीटरने वाढवण्यात आली आहेत. यामुळे धरणातून होणाऱ्या विसर्गात लक्षणीय वाढ झाली आहे.

सध्या एकूण १० वक्रद्वार उघडून धरणातून पाणी सोडले जात आहे. त्यापैकी वक्रद्वार क्र. ११, ६, १६, १०, १२, ९, १३, ८ आणि १४ ही गेट्स प्रत्येकी २.० मीटरने उघडी असून गेट क्रमांक १५ हे १.५ मीटरने उघडे ठेवण्यात आले आहे. या १० गेट्समधून एकूण ७१,२४८.९३ क्युसेक (२०१७.५२ युमेक्स) इतका विसर्ग सिंधफणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

दरम्यान, धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग कमी-जास्त करण्याबाबत प्रशासनाकडून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

धरण प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार, सिंधफणा व गोदावरी नदीकाठावरील तसेच पुरग्रस्त भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन माजलगाव प्रकल्प पूरनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now