IMD Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा थंडीचं मोठं संकट, 14 जिल्ह्यांना आयएमडीचा इशारा

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

महाराष्ट्रात यंदाच्या हंगामात पावसानं अक्षरशः कहर केला. अतिवृष्टी, नद्यांना आलेले पूर आणि घरांमध्ये घुसलेलं पाणी यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाले. खरीप हंगाम हातातून निसटला आणि अनेक ठिकाणी घरादारासकट पशुधन वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले.

Amazon

Amazon App Player

Download Now

मान्सूनसोबत अवकाळी पावसानेही उच्छाद मांडला. राज्यात मान्सून वेळेपेक्षा आधी दाखल झाल्यानं पावसाचा मारा जास्त काळ सुरू राहिला. पावसाचा धोका आता काहीसा ओसरला असला, तरी महाराष्ट्रावर पुन्हा एक नवीन हवामानिक संकट ओढावण्याची चिन्हं तयार झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर आयएमडीने राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांसाठी हायअलर्ट जारी केला आहे.

काय सांगतो हवामान विभागाचा नवा अंदाज?

पुढील 48 तासांत महाराष्ट्रात तापमानात लक्षणीय घट होणार असून राज्यभर थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने तापमान सरासरीपेक्षा खाली जाणार आहे. यासाठी आयएमडीने विविध भागांना यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी ही माहिती दिली असून, नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

थंडीचा परिणाम कोणत्या जिल्ह्यांवर होणार?

मराठवाडा –
जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर

विदर्भ –
गोंदिया, नागपूर

उत्तर महाराष्ट्र –
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर

पश्चिम महाराष्ट्र –
पुणे, सोलापूर

या सर्व जिल्ह्यांना आयएमडीकडून थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला असून तापमान झपाट्याने घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सतर्कतेचं आवाहन

राज्यात पुन्हा एकदा थंडीची तीव्रता वाढू शकते. ज्या नागरिकांना दम्याचा किंवा श्वसनासंबंधी त्रास आहे, त्यांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि उघड्यावर काम करणाऱ्या लोकांनी योग्य संरक्षणाची काळजी घेणं आवश्यक आहे.

दरम्यान, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतातही तापमानात मोठी घसरण होणार असल्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र अक्षरशः गारठणार असल्याचं चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now