जिल्ह्यात खेळाच्या माध्यमातून जीवनकौशल्याधारित शिक्षणाची प्रभावी मोहीम

Spread the love

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ

जिल्ह्यातील ५ हजार ३०० शाळांमध्ये राबविण्यात येणार ‘टॉय बँक’ उपक्रम

Verification: 1fe30fb203b45d5d

अहिल्यानगर /
कमी उत्पन्न गटातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ हे प्रभावी माध्यम ठरू शकते, या संकल्पनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे पाठबळ देत ओपन ट्री फाऊंडेशनच्या ‘टॉय बँक’ उपक्रमाचे कौतुक केले आहे. सध्या अहिल्यानगर तालुक्यातील १५ शाळा आणि ९ अंगणवाडी केंद्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या उपक्रमाचा पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात विस्तार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.

Amazon

Amazon App Player

Download Now

मुख्यमंत्री फडणवीस यांनी फाउंडेशनच्या कार्याचा ग्रामीण भागातील शिक्षणावर होणारा सकारात्मक परिणाम लक्षात घेऊन, या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक सहकार्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना केल्या. खेळाधारित शिक्षण मुलांच्या सामाजिक, बौद्धिक व भावनिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अहिल्यानगर जिल्ह्यात उपक्रमाचा वेगाने विस्तार

‘द ओपन ट्री फाऊंडेशन’ मार्फत राबविण्यात येणारा टॉय बँक प्रकल्प सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील १५ शाळांमध्ये आणि ९ कम्युनिटी सेंटरमध्ये सुरू असून सुमारे ३,७०० विद्यार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळत आहे. अंगणवाडी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असून, १०० हून अधिक शिक्षक या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत सक्रीय योगदान देत आहेत.

खेळाच्या माध्यमातून मुलांमध्ये संवादकौशल्य, नेतृत्वगुण, तणावनियंत्रण, सकारात्मक विचारसरणी व सामाजिक भान विकसित करण्याचे उद्दिष्ट टॉयबँक लाइफ स्किल्स प्ले प्रोग्राम्स मार्फत साध्य केले जात आहे.

डिसेंबरमध्ये २५ नवीन शाळांची भर

उपक्रमाचा आवाका वाढवत डिसेंबर महिन्यात २५ नवीन शाळांना या प्रकल्पात समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे आणखी सुमारे ५,००० विद्यार्थ्यांना आनंददायी आणि अनुभवाधारित शिक्षणाचा लाभ मिळणार आहे. यासोबतच आणखी काही कम्युनिटी सेंटर कार्यक्रमात जोडण्याचाही फाउंडेशनचा मानस आहे.

जिल्हा परिषदेचे पूर्ण प्रशासकीय सहकार्य

या उपक्रमासाठी आवश्यक परवानग्या, समन्वय, प्रशिक्षणासाठी जागा आदी सर्व बाबतींत जिल्हा परिषदेकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे फाउंडेशनने सांगितले. प्रकल्पाचे मुख्य समन्वय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय व शिक्षण विभागामार्फत केले जात आहे.

दीर्घकालीन योजना : पुढील ३–४ वर्षांत जिल्ह्यातील सर्व ५,३०० शाळांमध्ये अंमलबजावणी

टॉय बँक प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून अहिल्यानगर तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची उपयुक्तता लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील ३–४ वर्षांत जिल्ह्यातील सर्व ५ हजार ३०० शाळांना (शासकीय + खासगी) टप्प्याटप्प्याने प्रकल्पात समाविष्ट करण्याची विनंती फाऊंडेशनला केली आहे.

मुख्यमंत्री यांच्या विनंतीनुसार जिल्ह्यात उपक्रमाचा व्यापक विस्तार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती द ओपन ट्री फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वेता चारी यांनी दिली.

त्यांनी सांगितले,
“मुलांचा खेळ हा केवळ करमणूक नसून जीवनकौशल्य विकसित करणारे प्रभावी साधन आहे. येत्या काही वर्षांत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शाळांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now