परभणी /
येथील डॉक्टर लेन भागातील हॉटेल हर्ष इन समोरील विशाल गारमेंट्स होजिअरी या कपड्याच्या दुकानास आज मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास भिषण आग लागली. या आगीने या दुकानासह गोदामातील संपूर्ण कपड्याच्या मालाने पेट घेतला. सुमारे पाऊण तासापासून आग आटोक्यात आली नाही.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
दुकानाचे दैनंदिन व्यवहार आटोपून दुकान मालक आपल्या त्रिमुर्ती नगरातील निवासस्थानी रवाना झाले होते. तेव्हा विशाल गारमेट्स होजिअरी या दुकानातून शटर खालून धूर दिसून आल्यानंतर प्रत्यक्षदर्शनींनी तात्काळ दुकान मालकास कल्पना दिली . तेव्हा संबंधित दुकान मालकाने अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांना थेट कार्यालयात जावून माहिती दिली. परंतु, अग्निशामक दलाचा बंब येईपर्यंत या दुकानातील कपड्याच्या मालाने मोठा पेट घेतला. बंब आल्यानंतरसुध्दा योग्य दाबाने पाण्याचा मारा होऊ शकला नाही. तेव्हा तो बंब तेथून पुन्हा माघारी फिरला. त्यावेळी आगीने चोहोबाजूंनी वेढा दिल्यानंतर संपूर्ण दुकान सुमारे पाऊण तास आगीच्या विळख्यात जळत होते. या आगीने वरच्या मजल्यावरील दोन घरांना धोका निर्माण झाला. तेव्हा तेथील रहिवाशांनी भितीपोटी घर रिकामे केले.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
बातमी लिहिपर्यंत म्हणजे 10.54 मिनीटापर्यंत हे दुकान आगीच्या विळख्यातच होते. वीज वितरण कंपनीने तातडीने या परिसरातील वीज पुरवठा खंडित केला. या आगीमुळे धोका होऊ नये म्हणूनआसपाच्या दुकानदारांनी तातडीने आपआपली दुकाने उघडून तेथील माल सुरक्षित स्थळी हलविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. दरम्यान आग आटोक्यात आणण्याकरीता प्रत्यक्षदर्शनींनी प्रयत्न केला खरा परंतु, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. नवा मोंढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व आग आटोक्यात आणण्याकरीता संबंधित यंत्रणांना पाचारण केले.
दरम्यान, खासदार संजय जाधव यांनी घटनेचे हे वृत्त कळाल्याबरोबर घटनास्थळी धाव घेतली. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, मनपा आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच पूर्णा, मानवत व अन्य ठिकाणांहून अग्निशामक दलाचे बंब बोलावून घेतले. स्थानिक पातळी अग्निशामक दल तसेच अन्य सरकारी यंत्रणाच्या अकार्यक्षमतेबद्दल खासदार जाधव यांनी यावेळी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली.