परभणी :
देशाची भूमी ही तथागत बुद्धांची पवित्र भूमी असल्याने जगातील सर्व बौद्ध उपासक भारताकडे श्रद्धा आणि आदराने पाहत असतात. तथागतांचा धम्म हा नैतिकता, करुणा आणि समृद्धी शिकवणारा आहे. त्यामुळेच तो संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा महामार्ग आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील भंते अनालायो यांनी केले आहे.

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
परभणी जिल्ह्यामधील मानवत तालुक्यातील मांडाखळी येथे आश्रय सेवाभावी संस्थेच्या कडून अध्यक्ष धम्मदूत डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्या पुढाकाराने अश्विन पौर्णिमेनिमित्त आयोजित धम्मदेशना व परित्राण पाठ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात थायलंड येथील भिक्खू संघाने सहभागी होत धम्मोपदेश दिला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला 50 फूट उंच धम्मध्वजाचे ध्वजारोहण हे भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उद्घाटन सोहळा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि भिक्खू संघाच्या हस्ते पार पडला.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
या प्रसंगी जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, “बौद्धधम्माचे विचार हे समस्त मानवजातीच्या कल्याणाचे आहेत. प्रत्येक व्यक्तीने हे विचार आत्मसात करून आपले जीवन समृद्ध करावे. डॉ. हत्तीअंबीरे यांनी ग्रामीण भागात बुद्धविहार उभारण्याचे घेतलेले पवित्र कार्य हे स्तुत्य आहे,” असे ते म्हणाले.
डॉ. हत्तीअंबीरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, “मांडाखळी परिसरात लवकरच भव्य बुद्धविहार उभा राहणार आहे. अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने थायलंडमधील भिक्खू संघाचे आगमन हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. तथागतांचा आणि डॉ. आंबेडकरांचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
कार्यक्रमात भंते डॉ. उपगुप्त महाथेरो, भंते पयाबोधी, भंते मोगलायन आदींनीही प्रेरणादायी धम्मदेशना दिल्या. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी चव्हाण, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची विशेष उपस्थिती लाभली.
चिवरदान उपक्रमात विविध गावांतील उपासकांनी भिक्खू संघाला चिवरदान अर्पण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वाहिवळ यांनी केले, तर प्रकाश हातागळे यांनी आभार मानले.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
या यशस्वी कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. राजेश रणखांब, आकाश लहाने, डॉ. सुनील तुरुकमाने, सुधीर कांबळे, राहुल साळवे, अमोल धाडवे, अंबादास तूपसमिद्रे, प्रकाश हातागळे, उत्तम गायकवाड, अमित काळे, बुद्धभूषण हत्तीअंबीरे, ऋषिकेश कांबळे, चैतन्य गायगोधने, अजय वाघमारे, चंद्रकांत जोंधळे, कैलाश पतंगे, मकरंद बानेगावकर, रमेश गोरे, विकास जोंधळे, अमोल लहाडे, यशवंत थिटे, विशाल डावरे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास जिल्हाभरातून मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते.